⚡कणकवली ता.०५-: गुरावर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. यात काहीवेळा लवकर व योग्य उपचार न मिळल्यास गुरे दगावतात. शेतकऱ्यांनाही गुरांच्या उपचारासाठी मोठा खर्च होतो. यासाठी कणकवली पशुसंवर्धन विभागाच्यावतीने व फोंडाघाट येथील कै. राजाराम मराठे कृषी विद्यालयाच्या कृषी दुतांच्या सहकार्याने मोफत पशु लसीकरण शिबीर नुकतेच नागवे येथे घेण्यात आले.
शिबिरात सरपंच नारायण आर्डेकर, डॉ. योगेश गोसावी, डॉ. सतीश राऊत, डॉ. देवेंद्र खानवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशु लसीकरण करण्यात आले. शिबिराला ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात गुरांना जंतुनाशक औषधे पाजण्यात आली. गोचीड निर्मूलन व लसीकरण, गर्भ तपासण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती केली. यावेळी तेजस पाटील, सुरज रणदिवे, बालाजी जोगदंड, वैभव धायगुडे, प्रवीण कोळी, अक्षय बंडगर, परवेज मुलानी, प्रीतम पाटील, अक्षय रुपणर, रणजीतसिंह गडदे आदी कृषीदुतांनी शिबिराला सहकार्य केले. शिबिराला ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ संस्थेच्या संचालिका सौ. राणे, प्राचार्य डॉ. मोहिते सर, प्रा. सुशीलकुमार मोटे, प्रा. पियुष शिर्के, डॉ. योगेश जंगले तसेच इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
