संत निरंकारी मंडळातर्फे कणकवली
येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

⚡कणकवली ता.०४-: सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मंडळाच्या शाखा कणकवली तर्फे 5 जुलै रोजी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संत निरंकारी मिशन ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे. अध्यत्मिकतेसोबतच हे मिशन मानवहिताच्या कार्यात जसे रक्तदान, स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक कॅम्प यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सेवा देत आहे. ज्ञात असावे अलीकडे आलेल्या वैश्विक महामारीमध्ये रेशन वस्त्रे, आरोग्य कॅम्प यांच्या माध्यमातून तर नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड, रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, बांदा, दोडामार्ग आदी ठिकाणासह संत निरंकारी मिशनने विश्वातील अनेक ठिकाणीं मदतीचा हात पुढे केला आहे आणि यापुढे ही हे कार्य अविरत सुरू राहणार आहे.

सदर रक्तदान शिबिरास कणकवली ब्रांच मधील निरंकारी भक्त तसेच स्थानिक नागरिक यांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या सेक्टर कणकवलीचे संयोजक श्री. विलास जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9420822281 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page