कोकणात शिवसेनेला उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय
⚡कणकवली ता.२९-: राज्यात शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणात शिवसेनेची पकड कायम ठेवण्यासाठी कणखर नेतृत्व, आक्रमक वक्तृत्व असलेले गौरीशंकर खोत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाणारे गौरीशंकर खोत यांच्यावर पक्षाने उपनेते पदाची मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्ग शिवसेनेला ताकद दिली आहे.तर राजापूरचे आ.राजन साळवी यांनाही उपनेते म्हणून निवड केली आहे.
गौरीशंकर खोत हे एकेकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय होते.राणेंच्या निवडणूक रणनीतीमध्ये विजयाची आखणी हुशारीने मांडण्याचे काम ते करायचे.कालांतराने पुन्हा गौरीशंकर खोत यांनी शिवसेनेत प्रवेश केला,त्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कणकवली तालुक्यातील नांदगांव विकास सोसायटीच्या निवणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवत १३ ही जागांवर विजय मिळवला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत गौरीशंकर खोत यांच्याकडे उत्कृष्ट वक्ता,अभ्यासू वक्तृत्व ,उत्तम संघटन कौशल्य,निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती असलेल्या गुणांमुळे असंख्य शिवसैनिकांचा पाठींबा आहे.आगामी निवणुकामध्ये श्री.खोत यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.त्यामुळेच त्याची निवड जाहीर करण्यात आली आहे.
सावंतवाडी विधानसभेचे आमदार तसेच दीपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही शिंदे गटात दाखल होत साथ देण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात त्यांचा शिवसेनेला त्याचा संघटनेवर परिणाम होऊ नये,यासाठी मातोश्री वरुन सूत्र हलवण्यात येत आहेत. गौरीशंकर खोत यांची थेट उपनेते पदी निवड करत सिंधुदुर्गात निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद देण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यात येत असल्याचे चित्र या निवडीतून दिसत आहेत.
