“त्या” पाच एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे

मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा पाठपुरावा यशस्वी

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी डेपोतील पाच कर्मचार्याचे तडकाफडकी निलंबन
अखेर मनसेचे उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे मागे घेण्यात आले या निलंबनाबाबत आगर व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करण्यात आली होती तर नीलंबन मागे न घेतल्यास धडक मोर्चाचा इशारा ही देण्यात आला होता याची दखल घेऊन हे निलंबन मागे घेण्यात आले.

या विषयात वेळो वेळी मनसेचे माजी उपजिल्हा अध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, परिवाहनचे जिल्हाअध्यक्ष अॅड. राजु कासकर यांचेही सहकार्य लाभले एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी पाठीशी राहिले आहेत त्याच पद्धतीने आपल्यावर यापुढे कोणताही अन्याय होणार नाही आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मनसे सातत्याने चालू ठेवणार असे यावेळी बोलताना श्री राऊळ यांनी कर्मचारी वर्गाला आश्वासन दिले आपण कधीही हाक द्या आम्ही आपल्या सोबत नेहमी राहू असेही ते म्हणाले एसटी कर्मचारी वर्गानी सुधिर राऊळ यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page