वैभव सहकार पॅनलच्या राजेंद्र शिंगाडे, बाळकृष्ण रणशिंग यांची निवड
⚡सिंधुदुर्ग दि.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी पतसंस्थेच्या संचालकपदी विद्यमान वैभव सहकार पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, मालवण मतदार संघातून राजेंद्र शिंगडे तर वैभववाडी मतदार संघातून बाळकृष्ण रणशिंग हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची मागील निवडणूक ही तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळ सखाराम सकपाल, चंद्रशेखर उपरकर, मंगेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांनी एकत्र येत बिनविरोध केली होती. त्याप्रमाणे आताही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. यावेळी सर्व उमेदवार सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना पदाधिकारी पतसंस्थेचे माजी पदाधिकारी यांना एकत्र घेऊन चर्चा करणार असल्याचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी सांगितले आहे. ही बैठक लवकरच आयोजित केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
