पतीच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिसांत तक्रार
⚡ओरोस ता.२९-: पत्नीसह दोन लहान मुलींना मारहाण केल्याप्रकरणी पत्नीने पती विरोधात तक्रार ओरोस पोलिस ठाण्यात दाखल केली असून, मारहाणीचा प्रकार ओरोस येथे सोमवारी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
ओरोस पोलीस ठाण्यात हा दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून पती विरोधात भा. द.वी कलम 323, 504, 506 सह जे जे कायद्यातील 75 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी व तक्रारदार या दोन्ही कुडाळ तालुक्यातील मूळ रहिवासी असून सध्या ते ओरोस येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा हॉटेलं व्यवसाय आहे.
याबाबत पत्नीने मंगळवारी दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी २७ रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत राहत असलेल्या घरात पतीने आपल्याला व आपल्या दोन्ही मुलींना हाताचा थापटाने तोंडावर मारले व लाथांनी मारहाण केली. त्यानंतर अचानक आपले केस खेचून भिंतीवर आदळले. तसेच मंगळवारी सकाळी उठून पुन्हा रात्रीचे भांडण उकरून काढून हाताचे थापटाने मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस नागरगोजे हे करीत आहेत.
