सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी मार्गदर्शन करणार
⚡कणकवली ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून पहिल्या टप्यात ८५ पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांना निवडश्रेणी मंजुरीचा आदेश करण्यात आला . सदर आदेश योग्य त्या कार्यवाहीसाठी तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे . हे शासन निर्णय व प्रत्यक्ष मंजुरी आदेश निर्गमित होण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले . त्या सर्वांची माहिती देण्यासाठी तसेच पुढील कार्यवाही संदर्भात करावयाच्या नियोजनासाठी गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी १० वा . सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस या ठिकाणी निवडश्रेणी पात्र पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची सभा आयोजित करण्यात आली आहे .
या सभेमध्ये सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी मार्गदर्शन करणार आहेत . तरी सर्व निवडश्रेणी मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी सभेसाठी उपस्थित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे . या सभेत अन्य माहितीही देण्यात येणार आहे . अशी माहिती बाबू परब , सोनू नाईक , भानू तळगावकर , रमेश आर्डेकर , विनायक उमयें , कैवल्य पवार व विश्वनाथ परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे .
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षण विभागात काम करून सेवानिवृत्त झालेले शिक्षक शासनाकडून व नंतर प्रशासनाकडून सेवांतर्गत प्रशिक्षणाचे वेळीच योग्य ते नियोजन व कार्यवाही न झाल्याने निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित झाले होते . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवीधर श्रेणीधारक शिक्षक प्रतिनिधींनी सन २०१२ पासून शासन व परिषद स्तरावर सातत्याने केलेल्या अथक परिश्रमातून अखेर प्रशिक्षणाच्या अटीतून सवलत देणारा शासन निर्णय निर्गमित झाला . या सर्व प्रयात्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवीधर श्रेणीधारक सेवानिवृत्त शिक्षकांचा तसेच शासन व परिषद स्तरावरील अधिकारी वर्गाचा चांगला सहयोग लाभला . या शासन निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांना लाभ झाला . त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून पहिल्या टप्यात ८५ पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांना निवडश्रेणी मंजुरीचा आदेश करण्यात आला . सदर आदेश योग्य त्या कार्यवाहीसाठी तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे .
हे शासन निर्णय व प्रत्यक्ष मंजुरी आदेश निर्गमित होण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले . त्या सर्वांची माहिती देण्यासाठी तसेच पुढील कार्यवाही संदर्भात करावयाच्या नियोजनासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे . या तरी सर्व निवडश्रेणी मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी सभेसाठी उपस्थित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे . या सभेत अन्य माहितीही देण्यात येणार आहे . अशी माहिती बाबू परब , सोनू नाईक , भानू तळगावकर , रमेश आर्डेकर , विनायक उमयें , कैवल्य पवार व विश्वनाथ परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे .
