बांदा केंद्र शाळा १ चा विद्यार्थी
⚡बांदा ता.२७-: शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटातून चतुर्थी क्रमांक मिळविला.
त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, शिक्षक, आईवडील सौ राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समर्थ याने यापूर्वी देखील जिल्हा, राज्यपातळीवर विविध स्पर्धामध्ये यश मिळविले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.
