अंमली पदार्थ, व्यसनापासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे आवाहन

देवगड ता.२७-: तरुण पिढी ही अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहे. आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी. मादक पदार्थाचा वापर मानवी मोठ्या प्रमाणात होतो .त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी व तरुणांनी अमली पदार्थापासून व व्यसनाधीनतेपासून दूर रहावे .व आपले जीवन सुखकर करावे.असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी शेठ म.ग.हायस्कुल मधील विद्यार्थाना मार्गदर्शन करताना केले .

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सोमवारी सकाळी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथे शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे सेवन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच NDPS कायदा व इतर भारतीय कायद्याविषयी माहिती देण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण पोलीस हवालदार फकरुद्दीन आगा विद्यालयाचे शिक्षक वर्ग उपस्थित होते .

You cannot copy content of this page