⚡देवगड ता.२७-: येथील शेठ हायस्कूलमध्ये मार्च 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक संजीव राऊत, स्थानीय समितीचे खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य आणि माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, पर्यवेक्षक तानाजी पाटील, दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रथम माध्यमिक शालान्त परीक्षेतील शाळेमध्ये प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व अभिनंदन प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ९०%पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याच वेळी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे मध्ये प्रथम तीन क्रमांक काने उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. शाळेचे प्रथम तीन विद्यार्थी यामध्ये कुमारी मनस्वी विनायक बांदिवडेकर ९७%,मिहीर महेश सकपाळ ९६%, वेदांती जितेंद्र पिसे ९६%, आणि गौरी राजेंद्र धुरी ९५.८०% या विद्यार्थ्यांनी देवगड तालुक्यांमध्ये देखील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
"विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या कष्टांचा, त्यांच्या पालकांचा, शिक्षकांनी घेतलेल्या कष्टांचा, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच ग्रामस्थांचा देखील सहभाग असल्याचे संजीव राऊत म्हणाले". या सर्वच घटकांनी आपापली भूमिका योग्य रीतीने केल्यामुळे शाळेला हे घवघवीत यश मिळाल्याचे गौरवोद्गार मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी काढले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना चंद्रकांत शिंगाडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी याच प्रकारे अधिकाधिक यश संपादन करावे आणि आपल्या पालकांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय जोशी यांनी सर्व गुणवंत यांनी आज मिळविलेले यश यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमधून मनस्वी बांदिवडेकर, वेदांती पिसे, मिहीर सकपाळ तसेच बारावीतील विद्यार्थिनी केतकी आंबेरकर यांनी मनोगते व्यक्त केली. तर उपस्थित पालकांमधून स्वप्नज्या बिर्जे, महेश सकपाळ मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी तर निवेदन आणि आभार अजित सुरुंगले यांनी केले.
यावेळी शाळेतील माध्यमिक शालांत परीक्षा २०२२ मधील शाळेतील ९०% आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे-
श्रावणी संजय राणे ९३.६०%, चिरायु दीपक आडिवरेकर ९३.६०%, दीक्षा सुनील पेडणेकर ९३.४०%, चैत्राली पंढरीनाथ मणचेकर ९३%, आदित्य रणजित हिर्लेकर ९३%, अथर्व श्रीकृष्ण रानडे ९२.६०%, वेदांत विवेकानंद हरम ९१.८०%, अनय श्रीरंग भिडे ९१.६०%, सुशील प्रकाश पंडित ९१.४०%, आर्यन मकरंद जोशी ९०.८०%, सोपान संतोष नार्वेकर ९०.८०%, पियुष संतोष चव्हाण ९०.४०%, सानिका महेश शेडगे ९०.२०%, दुर्गेश हितेश कुबल ९०%.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२२ मधील शाळेमध्ये असलेल्या वाणिज्य शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी-
केतकी संतोष आंबेरकर७९%, प्राची सुनील कदम ७१.८३%, सानिया संजय तांबे ७१.३३%.
