सिंधुदुर्ग महाविद्यालयात शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. मुंबई, कस्टम विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी श्री.सत्यवान रेडकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे आयोजन करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलच्या वतीने ग्रंथपाल संग्रामसिंह पवार, प्रा.डॉ.सुमेधा नाईक, प्रा.डॉ. एम. आर.खोत यांनी केले होते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्ष्यांचे स्वरूप, पात्रता, अभ्यासक्रम, निवड पध्दती याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी इंग्रजी व्याकरण या विषयाच्या अभ्यासा साठी टिप्स देखील दिल्या गेल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के.के.राबते, प्रा. खोबरे एस. पी., प्रा. खरात, प्रा.चौगले एच. एम . व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page