वरवडे येथील आयडियल इंग्लिश
स्कूलच्या गुणवंत्त विध्यार्थांच्या सत्कार

⚡कणकवली ता.२६-:
वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॅा. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी मुलांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्था कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे,संस्था संचालिका डॉ.हेमा तायशेटे,संस्था सदस्य यज्ञेश शिर्के,डॉ.निलेश कोदे,सल्लागार डी.पी. तानावडे,यशोदीप अकॅडमीचे सौरव पुजारी,आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई शिक्षक,पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेचा यंदा बारावीचा शंभर टक्के निकाल लागला. यात स्नेहल परब हीने आणि मृण्मयी गायकवाड ९३.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. अमृता चोपडे हीने ९२.५० टक्के, तर प्राची तायशेटे हीने ९२.३३ टक्के गुण पटकावले. वाणिज्य शाखेतून प्रार्थना पटेल ८३.८३, सलोनी शिरवलकर ८३ तर साहिल कदम यांने ७८ टक्के गुण पटकावले. दहावीच्या परीक्षेत सिद्धेश लांबर ९६.८० टक्के, आदित्य गोवेकर ९६ टक्के आणि पूर्वा सावंत हीने ९५.८० टक्के गुण पटकावले. तसेच ९० टक्के पेक्षा अधिक 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्वरूप राऊळ यांने गणित विषयात शंभर टक्के गुण पटकावले. सिद्धेश लांबर यांने संस्कृत विषयात शंभर पैकी ९९ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ कासले यांने ही मराठी विषयात शंभर पैकी ९९ गुण मिळवून जिल्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. अशा गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.

You cannot copy content of this page