⚡वेंगुर्ला ता.२६-: गाडीअड्डा भागातील इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळाच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव कार्यक्रम येथील भगवती मंदिरात पार पडला.
गाडीअड्डा येथील रहिवासी अर्थव गणेश अंधारी, चैतन्य सदानंद शारबिद्रे, तन्वी विजय केळजी, निताली रमेश शारबिद्रे, वेदिका संतोष केदार, प्रणाली हेमंत शारबिद्रे, दिव्या महेश नाईक या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. तसेच शौर्य शंकर मांजरेकर याने शालेयस्तरावरील विविध स्पर्धा परिक्षांमध्ये क्रमांक पटकाविले आहेत. या सर्वांच्या उल्लेखनीय यशाची दखल घेऊन गाडीअड्डा मित्रमंडळातर्फे त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शंकर मांजरेकर, सुहास मांजरेकर, संदिप केळजी, हेमंत केदार, गौतम मुळे यासह गाडीअड्डा येथील नागरिक उपस्थित होते.
