दीपक केसरकरांनी सेनेला दिला थेट इशारा
⚡मुंबई दि.२६-: ‘जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर शिंदेंच्या गटात सामील झाले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलत असताना केसरकर यांनी आपली भूमिका मांडत इशारा दिला आहे.
‘चौपाटी ही राज्याचा मुख्यमंत्री ठरवत नाही. मुख्यमंत्री हे नरिमन पॉईंटमधील विधीमंडळात ठरत असतो, जनता ठरवत असते. ते पवित्र असे व्यासपीठ आहे. त्यांनी एक आमदाराला जनावराची उपमा दिली. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले. महिन्यापूर्वीच तुम्हाला आमदारांनी निवडून आणलं. कुठल्या तरी माणसाच्या मनात वेदना निर्माण होते. त्यामुळे वाद निर्माण होते, राज्यात दंगली निर्माण होतात. जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच केसरकर यांनी दिला.
