मानसिक आरोग्य व समाधान यासाठी योग महत्वाचा

डॉ. सौ. संगीता तुपकर:मळगाव येथे योग दिनाचे औचित्य साधून उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली कार्यक्रम संपन्न

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ- : कोणतेही चांगले काम करण्यासाठी योग लागतो. योग हा फक्त शरीरासाठी करायचा नसतो. तर मानसिक आरोग्य व कोणतेही चांगले काम केल्यानंतर मिळणारे समाधान यासाठीही योग महत्वाचाअसतो, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ. सौ. संगीता तुपकर यांनी मळगाव येथे केले.

मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित व सखी ग्रुपवतीने उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली हा कार्यक्रम योग दिनाचे औचित्य साधून वाचनाल्याच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात पार पडला. यावेळी तुपकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सखी ग्रुपच्या वतीने सौ. पूनम पटेकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष श्री. हेमंत खानोलकर. वाचन मंदिरचे कार्यवाह श्री. गुरुनाथ नार्वेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तुपकर पुढे म्हणाल्या, अनेक व्याधीवर होत असलेला उत्तम उपाय म्हणजे योग आहे. म्हणून प्रत्येकाने नेहमी आपल्या कुवतीनुसार थोडातरी योग करावा, असे तुपकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. तुपकर यांनी योगांविषयी मार्गदर्शन करून अनेक प्रात्यिक्षिक महिलाकडून करून घेऊन त्यांचे महत्त्व सांगितले. श्री. नार्वेकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे भेटकार्ड देऊन वाचनमंदिरच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. तुपकर मॅडम यांच्या सहकारी व पंचक्रोशीतील वाचक सभासद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नार्वेकर, सूत्रसंचालन स्नेहा खानोलकर तर पाहुण्याची ओळख श्री. हेमंत खानोलकर यांनी करून दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, कर्मचारी व सखी ग्रुप यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page