प्रा. वामन खोत:मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
⚡मालवण ता.२१-: आपल्या जीवनात योगाला फार मोठे स्थान असून व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधना महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी या तीन सूत्राचा अवलंब करून आपले शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त बनवावे असे प्रतिपादन भंडारी ए. सो.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वामन खोत यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो.कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वामन खोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले त्यावेळी श्री. खोत हे बोलत होते. यावेळी प्रा. रुपेश बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. गुरुदास दळवी, प्रा. स्नेहल पराडकर, गणेश सावंत, प्रा. गावडे, प्रा. वैभवी वाक्कर, प्रा. अदिती शेर्लेकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी प्राचार्य खोत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगतानाच योगामुळे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रफुल्ल देसाई यांनीही योगासनांचे महत्त्व सांगितले. शेवटी प्रा. स्नेहल पराडकर यांनी आभार मानले. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करून योगदिन साजरा केला.
