जागतिक योगदिनाच्या पार्श्र्वभूमीवर दाखविण्यात आली योगा व प्राणायाम प्रात्यक्षिक
⚡सावंतवाडी ता.२१- : जागतिक योगदिनाच्या पार्श्र्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा योग समितीचा कार्यक्रम सावंतवाडी येथे कळसुलकर हायस्कुलच्या हॉल मध्ये घेण्यात आला. यावेळी योगा व प्राणायाम प्रात्यक्षिक करून दाखवली मार्गदर्शन करण्यात आले.
जगातील २०० पेक्षा जास्त देशात २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा ८ वा जागतिक योग दिन आहे. भारतातील दोन महनीय व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगगुरू स्वामी रामदेव महाराज यांच्या पुरूषार्थमुळे जगाला योगाच महत्व पटल आहे. देशात हजारो ठिकाणी पतंजली योग समितीच्या माध्यमातून आजच्या दिवशी योग दिन साजरा करून लोकांना योग प्राणायाम करण्यासाठी प्रेरित केले जाते. पतंजली परिवार सिंधुदुर्गच्या वतीनेदेखील आज संपुर्ण जिल्ह्याभरात किमान २०० पेक्षा जात विविध ठिकाणी आज योगाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्र्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा योग समितीचा कार्यक्रम सावंतवाडी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी अॅड. दिलीप नार्वेकर, भारत स्वाभिमान अध्यक्ष महेश भाट, पतंजली युवा भारत जिल्हाध्यक्ष विद्याधर पाटणकर, दत्तात्रय निखार्गे, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शहरातील अनेक योग साधक, बंधू भगिनी व मेडिकल कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्याधर पाटणकर यांनी उपस्थितांना योगा व प्राणायाम प्रात्यक्षिक करून दाखवली व मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत दत्तात्रय निखार्गे यांनी त्यांना मदत केली. या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला
