मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई
⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: आरोस येथे पाईपलाईनसाठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्याविहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत होते, तसेच या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत होता त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. या विषयी मनसे आरोस विभाग प्रमुख मंदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाने याप्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून पाईपलाईनसाठी खोदलेले हे चर लवकरात लवकर बुजवावेत अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तात्काळ याची दखल घेत या रस्त्यावरील चर बुजवले. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
