*💫वेंगुर्ला दि.१८अजय गडेकर-:* बॅरिस्टर नाथ पै यांचे कार्य अलौकिक आहे.वेंगुर्ले येथे न.प.ने तात्काळ १० गुंठे जागा उपलब्ध केल्यास मी ५० लाख रुपयांचे चांगले संकुल (कम्युनिटी सेंटर) डीपीडीसी च्या माध्यमातून रत्नागिरी प्रमाणे वेंगुर्ले शहरामध्ये उभे करू.”वेंगुर्ले शहरातील विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याची संधी मिळाली पाहिजे,वेंगुर्ला शहरातील विद्यार्थ्यांना चांगली व्यायामशाळा – जिम उपलब्ध व्हावी आणि महिलांबद्दल विशेष आदर बॅ.नाथ पै याना होता त्या महिलांबद्दल चांगले उपक्रम त्या कम्युनिटी सेंटर मध्ये उभे राहिले पाहिजेत हे तीन प्रमुख उद्देश असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.” यासाठी ५० लाख ची जरी घोषणा केली असली,तरी “लागतील” तेवढे पैसे बॅ. नाथ पै यांच्या नावाने त्या कम्युनिटी सेंटरला वेंगुर्ले शहराला देण्याची ग्वाही त्यांनी दिली.नगरपरिषदेने ठेवा म्हणून जपणूक केली पाहिजे,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ले येथे केली.संसदपटू राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार बॕ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत ‘बॕ. नाथ पै’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन वेंगुर्ले प्राथमिक शाळा नं.१ येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदय सामंत यांच्या हस्ते बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन झाले.यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार दिपक केसरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर,रुची राऊत,न.प.उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,उमेश गाळवणकर, लेखिका अदिती पै,शैलेंद्र पै, कमलताई परुळेकर,अतुल बंगे,अमरसेन सावंत, बाबुराव अवसरे,माजी सभापती जयप्रकाश चमणकर व दिपक नाईक, डॉ. देवदत्त परुळेकर, प्रा. प्रवीण बांदेकर,सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर,माजी सभापती यशवंत परब,सुनिल डुबळे,नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आजचा बॅ. नाथ पै यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा हे मी भाग्य समजतो.बॅ. नाथ पै यांचा आदर्श आजच्या पिढीसमोर असून हा ठेवा जपण्याचे काम त्यांची नात अदिती पै करतेय,हे कार्य स्तुत्य आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केले.बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तक शासकीय ग्रंथालयामध्ये हे पुस्तक ठेवण्यात यावे. महाराष्ट्रात प्रत्येक ग्रंथालयामध्ये हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल.आपल्या खात्यामार्फत जिल्ह्यातील एक लाख तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी एक वर्षात राबविणार आहोत,असे ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की,भारत देश महासत्ता बनावे,हे बॅ. नाथ पै यांचे स्वप्न त्यावेळेस होते.कोकणचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले.बॅ. नाथ पै यांचे कार्य अलौकिक असून त्यांचे मार्गदर्शन ,विचारांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करू.त्यांच्या व्यक्तिमत्वाशी स्पर्धा नाही तर स्पर्शही करू शकत नाही,एवढे त्यांचे महात्म्य आहे.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चिपी विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न करतोय.बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना आणि तत्कालीन महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यासंदर्भात आपण निवेदने दिली होती.याबाबत सिंधुदुर्ग नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळ नाव द्यावे,असेही राऊत यांनी म्हटले.यावेळी अदिती पै हिच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री व आमदार दिपक केसरकर म्हणाले की,बॅ. नाथ पै यांचे यथोचित स्मारक वेंगुर्लेत व्हावे,अशी वेंगुर्लेवासीयांची अपेक्षा आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने शा व्यक्तिमत्वाची आठवण जपली गेली पाहिजे.प्रा.मधु दंडवते यांचेही कार्य अलौकिक आहे.शरद पवार हे सुद्धा याबाबत सांगायचे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजवादी तत्वज्ञान – विचारांचे फार मोठे अधिष्ठान आहे.येथे स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत प्रयत्न करतील,असा विश्वास त्यानी व्यक्त केला.यावेळी त्यांनी मार्च पूर्वी १० लाख रुपये या शाळेसाठी देण्याचे जाहीर केले.त्यांचे जेवढे प्रेम राजापूर – सिंधुदुर्ग मतदारसंघावर होते,तेवढेच प्रेम सीमाप्रश्न बाबतीत होते.सीमाप्रश्न सुटल्यास नाथ पै यांच्या स्मृतीस अभिवादन ठरेल,असेही दिपक केसरकर म्हणाले. यावेळी अदिती पै,कमलताई परुळेकर,देवदत्त परुळेकर व अन्य मान्यवर यांनी विचार व्यक्त केले.तसेच बॅ. नाथ पै आणि प्रा.मधु दंडवते यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम खासदार विनायक राऊत यांनी केले आहे,असे सुनिल डुबळे यांनी विचार व्यक्त केले. स्वागत शलेंद्र पै यांनी,प्रास्तविक व सूत्रसंचालन सचिन व
बॅ. नाथ पै यांचे कार्य अलौकिक : पालकमंत्री उदय सामंत…
