*खासदार विनायक राऊत यांचे रावजी यादव याना आश्वासन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की मागासवर्गीयांना विशेषतः नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात. याची अनेक उदाहरणे आहेत स्वतः मी आहेच. या आंदोलनाला ही श्री.सरमळकर यांचेच नव्हे तर अशी अनेक उदाहरणे आहेत. आमच्या या आंदोलनाकडे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित का करत आहेत हे तेच सांगू शकतात. श्रोते हो आपल्या पर्यंत आमचे याप्रकरणी गुन्हे समजले तर ते आमच्या पर्यंत पोचवालच. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर हे ही कोणत्या दबावाखाली खोटे बोलत आहेत हे अनाकलनीय आहे.असो. यांचे सहाय्यक औटघटकेचे राजेंनी ही केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे प्रयत्न करत आहोत. अशा या आंदोलनाच्या ६६ व्या दिवसाअखेर आमच्या सिंधुदुर्ग लोकसभा सदस्य, खासदार मा.श्री. विनायक राऊत यांनी भेट देऊन याप्रकरणी अधिकच्या चर्चेसाठी आपल्या तळगाव येथील बंगल्यात बोलावून घेतले. आज आम्ही त्यांना भेटून मागासवर्गीयांवर विशेषतः नवबौद्धांवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे औटघटकेचे राजेंनी जातीयवाद कसा जोपासला यांचे इतंभूत पुरावे दाखवून दिल्या नंतर त्यांनी मा. ग्रामविकासमंत्री महोदय यांच्याकडे याप्रकरणी सुनावणीची जबाबदारी घेऊन आम्ही मागणी केलेल्या कागदपत्रे देण्यास भाग पाडले जाईल, एवढेच नव्हे तर नोव्हेंबर 2020 मध्ये ही शासनाचे पदोन्नती निवड याद्या प्रसिद्ध न करता केलेल्या पदोन्नती आदेश रद्द करण्यात येतील, असे आश्वासित केले. याबद्दल मा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा असून मा. ग्रामविकासमंत्री याप्रकरणी सुनावणी घेईपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
