गोवा – फोंडा येथे १२ पासून अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

२६ राज्यातील हिंदू संघटना प्रतिनिधी, संत महंत राहणार उपस्थित

 
 सिंधुदुर्गनगरी -ता ०७
हिन्दू राट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यावर्षी १२ ते १८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा- गोवा येथे दशम अखिल भारतीय हिन्दू राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाला २६ राज्यातील हिन्दू संघटनांचे प्रतिनिधी व अनेक संत महंत उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती हिन्दू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ़ राज्य संघटक सुनील धानवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी  दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा ?’ या विषयांवर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट  यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्गनगरी  येथे आयोजित पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे  श्री. शंकर निकम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर उपस्थित होते.
        
यावेळी सुनील घनवट  म्हणाले की, नुकतेच ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी ‘समान नागरी कायद्याच्या आधारे शरीयतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही. हिंदूंना मुसलमान आवडत नसतील, तर हिंदूंनी भारत सोडून निघून जावे’, असे उघडपणे धमकावले आहे. मुसलमानांनी धमकावून काश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढले, आता उर्वरित भारतातून बाहेर काढण्याची त्यांची ही धमकी आहे. एकीकडे ‘आम्ही पाकिस्तानात गेलो नाही’, असे अभिमानाने सांगायचे आणि दुसरीकडे भारतीय संविधानाच्या आधारे बनलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी इस्लामची ढाल पुढे करायची, हे यापुढे चालणार नाही. मुसलमान पाकिस्तानात न जाता भारतात राहिले, हा त्यांनी भारतावर केलेला उपकार नाही ! आज पाकिस्तानात गेलेल्यांची स्थिती काय आहे, हे त्यांनी पहावे. भारतातील बहुसंख्य हिंदूंनी मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या विशेष सवलती देऊनही बंधुभाव जोपासला आहे, हे लक्षात घ्यावे. आताचा भारत गांधीगिरी करणारा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून स्वराज्यरक्षण करणारा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
          या वेळी हिंदु जनजागृती समितीचे  श्री. हेमंत मणेरीकर म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. या वर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड,  हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १००० पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
      सनातन संस्थेचे शंकर निकम म्हणाले की, केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे राममंदिर निर्माण, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधातील कायदे लागू होणे आणि कलम ३७० हटवणे आदींविषयी सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. ओवैसी ‘बाबरी घेतली; पण ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. देशभर हिंदूंच्या मिरवणुका तथा धार्मिक उत्सवांवर भीषण हल्ले होत आहेत. मिशनर्‍यांकडून बलपूर्वक होणार्‍या धर्मांतरामुळे ‘लावण्या’सारख्या हिंदू मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला ३२ वर्षे होऊनही काश्मिरी हिंदूंच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. एकूणच हिंदू सर्वत्र असुरक्षित आहे. त्यामुळे हिंदूंनी संविधानिक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक बनले आहे. हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल.
     या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार आणि हिंदु शेर म्हणून प्रख्यात असलेले टी. राजासिंह, ‘पनून काश्मीर’चे श्री. राहूल कौल, झारखंड येथील ‘तरुण हिंदु’ संघटनेचे अध्यक्ष श्री. नील माधव दास, तमिळनाडू येथील ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता दल) पक्षाचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई,  गोव्यातील ‘भारत माता की जय’ संघटनेचे संस्थापक श्री. सुभाष वेलिंगकर, अरुणाचल प्रदेश येथील ‘बांस संसाधन आणि विकास एजेंसी’चे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई, ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंदजी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे. सिंधुदुर्गातून या अधिवेशनात श्री. धनाजी मोहिते, श्री. संजय गावडे, श्री.पंकज पेडणेकर, श्री. राधाकृष्ण पावसकर आणि श्री. संदीप शिंदे हे उद्योजक सहभागी होणार आहेत.
  या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ४५ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी समर्थन पत्रे दिली आहेत.  जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
 

You cannot copy content of this page