शाहू वेशभूषा स्पर्धेत समर्थ पाटील लहान गटात राज्यात दुसरा

बांदा/प्रतिनिधी
शाहू महाराज जयंतीचे औचित्या साधून आयोजित केलेल्या शाहू वेशभूषा स्पर्धेमध्ये येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटातून राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला. अष्टपैलू संस्कृती मुंबई या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती.


समर्थ हा केंद्रशाळा नंबर 1 मध्ये, इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. बांदा सरपंच अक्रम खान आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विविध स्तरातून समर्थवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फोटो :-
समर्थ पाटील.

You cannot copy content of this page