राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी साधला सखी वन स्टॉप सेंटरशी संवाद

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सुप्रदा फातर्पेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला.

सखी वन स्टॉप सेंटर मधील सर्व केसेस चा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आला. प्रकरणे हाताळताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबतही त्यांनी केंद्र प्रशासक ॲड. पूजा काजरेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले, युवा सेनेच्या रूची राऊत आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page