२४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश शुल्क
सिंधुदुर्गनगरी ता ०६
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुलगे- मुली तसेच दारिद्र्यरेषेखालील मुलगे अशा एकुण २४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दोन गणवेश यासाठी ६०० रुपये याप्रमाने एकुण १ कोटी ४७ लाख ३३ हजार ६०० रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ हजार ५५६ विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी ६०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ० ते ३१ पटसंख्या असलेल्या १०१४ शाळातील विद्यार्थ्यांना ५० लाख ७० हजार अनुदान, ३१ ते १०० पटसंख्या असलेल्या ३३७ शाळातील विद्यार्थ्यांना ४२ लाख १२ हजार ५०० रुपये अनुदान, १०१ ते २५० पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ३६ शाळातील विद्यार्थ्यांना ९ लाख तर २५१ ते १००० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ३ शाळातील विद्यार्थ्यांना १ कोटी २ लाख ९५ हजार रूपये असे एकूण १ कोटी ४७ लाख ३३ हजार ६०० रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
मोफत गणवेश योजनेचा लाभ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना तसेच अनुसूचित जाती जमातीचे मुलगे व दारिद्र्यरेषेखालील मुलगी यांना देण्यात येतो त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील २७६० मूली,१४९ अनुसूचित जाती मुलगे,३६ अनुसूचित जमाती मुलगे, ६२३ दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मुलगे असे ३५३८ विद्यार्थ्याना २१ लाख ४० हजार ८०० रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुका ९३३ मूली, अनुसूचित जाती मुलगे ७१,अनुसूचित जमाती मुलगे २२, दारिद्रय रेषेखालील मुलगे २१७ असे मिळून १२७३ विद्यार्थ्याना ७ लाख ४५ हजार ८०० रूपये, कणकवली तालुका २९०९ मूली, अनुसूचित जाती मुलगे २९७, अनुसूचित जमाती मुलगे ६१,दारिद्रय रेषे खालील मुलगे ७८८ असे मिळून ४०५५ विद्यार्थ्याना २४ लाख ३३ हजार रूपये अनुदान, कुडाळ तालुका ३७७४ मूली, अनुसूचित जाती मुलगे ३१२,अनुसूचित जमाती मुलगे ८०, दारिद्र्य रेषे खालील मुलगे १२२२ असे मिळून ५३८८ विद्यार्थ्याना ३२ लाख ३२ हजार ८०० रूपये, मालवण १६३० मूली, अनुसूचित जाती मुलगे १४९,अनुसूचित जमाती मुलगे ३०, दारिद्र्य रेषे खालील मुलगे ३७३ असे मिळून २१८२ विद्यार्थ्याना १३ लाख ०९ हजार २०० रूपये,सावंतवाड़ी तालुका २९०८ मूली,अनुसूचित जाती मुलगे २२१,अनुसूचित जमाती मुलगे ६३, दारिद्र्य रेषेखालील मुलगे ८५५ असे मिळून ४०४७ विद्यार्थ्याना २४ लाख २८ हजार २०० रूपये, वैभववाड़ी तालुका १०४२ मूली, अनुसूचित जाती मुलगे ९३, अनुसूचित जमाती मुलगे ७, दारिद्रयरेषे खालील मुलगे ४६७ असे मिळून १६०९ विद्यार्थ्याना ९ लाख ६५ हजार ४०० रूपये, वेंगुर्ले तालुका १७२६ मूली, अनुसूचित जाती मुलगे १०१, अनुसूचित जमाती मुलगे २०, दारिद्रयरेषेखालील मुलगे ६१७ असे मिळून २४६४ विद्यार्थ्याना १४ लाख ७८ हजार ४०० रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. अश्या प्रकारे एकुण २४ हजार ५५६ विद्यार्थ्याना १ कोटी ४७ लाख ३३ हजार ६०० रूपये अनुदान गणवेश साठी वितरित करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
