अन्यथा मनसे छेडणार तीव्र आंदोलन; मनसे पदाधिकाऱ्यांचा इशारा
सावंतवाडी ता.२७-:तालुक्यातील आरोस, मळेवाड, आरोंदा, सातार्डा या गावांमध्ये बी एस एल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, तालुक्यात अनेक भागात बी एस एन एल सेवेचा सावळा गोंधळ चालू आहे. कार्ड ला रेंज नसणे, बोलताना आवाज तुटणे, ब्रॉड ब्रेंन्ड सेवा विस्कळित होणे, अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याबाबत तेथील ग्रामस्थांनी मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बी एस एन एल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ केल्याने मनसे पदाधिकऱ्यांनी थेट कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा प्रबंधक देशमुख यांनी कर्मचाऱ्यांची कमतरता, एक कर्मचारी चार-पाच गाव सांभाळतो आणि योग्य त्या प्रमाणात मटेरियल पुरवठा होत नसल्याने सेवा देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यावर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले असता आपण पुढील आठ दिवसात समस्या सोडवली जाईल असे आश्वासन देशमुख यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार विभाग अध्यक्ष मंदार नाईक संतोष भैरवकर बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, महाराष्ट्र सैनिक नंदू परब मनसे विभाग अध्यक्ष अभय देसाई मुकुंद धारगळकर आदी उपस्थित होते तर दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता न झाल्यास तेथील ग्रामस्थांसहइत मनसे आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे.
