रोटरी क्लब जिल्हा गव्हर्नर गौरीश धोंड यांनी व्यक्त केला विश्वास
बांदा/प्रतिनिधी देशासह जागतिक पातळीवर काम करणारी रोटरी क्लब ही संघटना बांदा शहरात लोकांच्या सेवेसाठी रुजू झाली असून अध्यक्ष मंदार कल्याणकर यांच्याशी नेतृत्वाखाली रोटरी क्लब बांदा शहर व परिसरातील जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विकासासाठी निश्चितच सक्रियपणे कार्यरत राहील असा विश्वास रोटरी क्लब चे जिल्हा गव्हर्नर गौरीश धोंड यांनी याठिकाणी व्यक्त केला.
बांदा रोटरी क्लबच्या वतीने आयोजित नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभात श्री धोंड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फर्स्ट लेडी प्रतिभा धोंड, सहाय्यक गव्हर्नर राजेश घाटवळ, सावंतवाडी रोटरी क्लबचे आनंद रासम, सावंतवाडीचे गोल्डन ज्यूबली प्रेसिडेंट साईप्रसाद हवालदार, सचिव सुधीर नाईक, इव्हेंट चेअरमन व क्लब समन्वयक ऍड. सिद्धार्थ भांबुरे, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे सहाय्यक गव्हर्नर शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बांदा रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव फिरोज खान, खजिनदार नरसिंह काणेकर, संचालक प्रमोद कामत, शिवानंद भिडे, प्रवीण शिरसाट, सुदान केसरकर, हनुमंत शिरोडकर, सुधीर शिरसाट, स्वप्नील धामापूरकर, राजाराम धारगळकर, आपा चिंदरकर, घनश्याम पावसकर, सुनील राऊळ, वसंत राऊळ, स्वागत नाटेकर, संदीप देसाई, रत्नाकर आगलावे, दिलीप कोरगावकर, संतोष सावंत, तुषार धामापूरकर, सचिन मुळीक, दिगंबर गायतोंडे, डॉ. नारायण नाईक, डॉ. जगदीश पाटील, मनसूख वसानी, डॉ. भालचंद्र कोकाटे, डॉ. संजय सावळ यांना मनाची पिन, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी नूतन कार्यकारिणीला आंतरराष्ट्रीय प्रेसिडेंट शेखर मेहता, जिल्हा गव्हर्नर वेंकटेश देशपांडे, सचिव राजेश साळगावकर, श्रीनिवास मालू, जिल्हा सचिव किशोर धुमे, मोहन मुलहेरकर, डॉ राजेश नवांगुळ, दिलीप साळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शहरातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिला उद्योजिका आनंदी आत्माराम शिरोडकर व चित्रकार अमित अजित कुबडे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष मंदार कल्याणकर म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून बांदा शहरात भरीव सामाजिक कार्य करायचे आहे. येत्या काही दिवसात शहरातील गरजू मुलांना सायकल वाटप, विधवा व गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी “पिंक रिक्षा योजना” तसेच शहरात नेत्र चिकित्सा शिबीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अधिकाधिक युवकांना रोटरी क्लब मध्ये सामावून घेऊन शहरात विकासाचे व रोजगाराचे व्हिजन ठेऊन काम करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नायडू व शिवानंद भिडे यांनी केले. आभार फिरोज खान यांनी मानले.
