ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन…
मालवण : (प्रतिनिधी) डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखांचा निधी जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती यांनी मंजूर करून घेतला. या रस्ता कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता कामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. हिवाळे खालची परबवाडी रस्ता नादुरुस्त झाल्याने वाहतुकीस अडथळाही निर्माण होत होता. ही समस्या लक्षात घेत माजी बांधकाम सभापती यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देवून तो पूर्ण केला. माजी सरपंच विश्वास परब, विश्वनाथ परब यांनी याबाबत पाठपुरवा केला.
रस्ता भूमीपूजन प्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत पवार, रघुनाथ धुरी, उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर, सोसायटी संचालक काका गावडे, रामचंद्र पवार, जितेंद्र परब, दिपक परब, प्रकाश परब, मंगेश परब, बाळा परब, शंकर धुरी, जयवंत परब, गुणाजी परब, प्रशांत परब, हरिश्चंद्र परब, सुनिल परब, तुकाराम परब, विवेक परब, सुर्यकांत परब, बबन परब, आप्पा परब, बाबाजी परब, अर्जुन परब, दिगंबर परब, गोपाळ परब, तन्मय परब, राजेश परब, अविनाश परब, ओम परब, जयेश परब, पकंज परब, शिवराम परब, शत्रुघ्न परब, सुजल परब यासह अन्य उपस्थीत होते. रस्ता काम सुरु झाल्यामुळे ग्रामस्थ मधून समाधान व्यक्त होत आहे.
