गोव्यात फिरायला गेलेल्या बेळगावच्या तरुणांचा भीषण अपघात…

अपघातात तिघे युवक ठार;एकजण गंभीर

गोवा ता.२२-:* गोव्यात फिरायला गेलेल्या बेळगावच्या तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. गोव्यातील म्हापसा येथे कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकून आज (रविवारी) सकाळी झालेल्या या अपघातात तिघे युवक जागीच ठार आले असून एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये नयन अनगोळकर (वय 28), रोहन गडाद (वय 26) आणि सन्नी अणवेकर या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर राहुल कारेकर हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर म्हापशातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील हे युवक आपली कार घेवून गोव्यात फिरायला गेले होते. आज सकाळी गोव्याहून परतत असताना म्हापशाजवळ कार वरील चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, करची समोरील बाजू पूर्णने चकानाचुर झाली आहे. हा अपघात म्हापशाजवळील कुचेली येथे झाला असून ही धडक इतकी भीषण होती की, तीन युवक जागीच ठार झाले तर अन्य एक गंभीर जखमी झाला असून म्हापसा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्हापसा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

You cannot copy content of this page