वेंगुर्ला ता.२१-:* तुळस गावचे मुळचे रहिवासी असलेले व भाजपाचे कोकण विकास आघाडी, मुंबईचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष आरोसकर यांनी तालुका कार्यालयात भेट दिली असता तालुक्याच्यावतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकतृत्वावर भाराऊन मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जीवन विद्या मिशन या सेवाभावी संस्थेत गेली २५ ते ३० वर्षे नामधारक म्हणून काम करत असताना सद्गुरु वामनराव पै माऊली व त्यांचे चिरंजीव प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. तसेच भविष्यात कोकणमधील ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी कोकण व मुंबईमधील समन्वयकाचे काम आपण कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे डॉ. सुभाष आरोसकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, डॉ. पुजा कर्पे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा सदस्य वसंत तांडेल, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगरसेवक श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, तालुका सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर, दिगंबर आरोसकर व ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
