कणकवली ता.२०-:* महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन समितीच्या उपाध्यक्षपदी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची निवड झाल्याबद्दल नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली, जुना भाजीपाला मार्केट) येथे नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळाच्यावतीने जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
राजकारणात आणि समाजकारणात वेगळेपण जपणाऱ्या संदेश पारकर यांच्याबद्दल कणकवलीकराना तसेच सिंधुदुर्गवासियांना नेहमीच आपुलकी वाटते. परंतु त्याच्या क्षमतेचा पुरेसा उपयोग केला जात नाही पण आघाडी शासनाने पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गचे महत्त्व वाढविण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांची केलेली निवड अचुक आहे. असे प्रतिपादन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी या प्रसंगी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला, व्यापारी वर्गाला माझ्या पदाचा लाभ कसा देता येईल याचे मी नियोजन करणार असल्याचे उत्तरादाखल संदेश पारकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या.
