पणजी येथे २७ मे रोजी’ मराठी आठव दिवस ‘ शंकर रामाणींवरील परिसंवाद व कविसंमेलन

कणकवली ता.२०-:* २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जागतिक मराठी दिन म्हणून साजरा होतो . त्याचे स्मरण वर्षभर राहावे यासाठी मुंबईच्या स्वामीराज प्रकाशनतर्फे दर महिन्याच्या २७ तारखेला वेगवेगळ्या भागांमध्ये ‘ मराठी आठव दिवस ‘ साजरा केला जातो . गेल्या २७ मार्च रोजी कोल्हापूर येथे तर २७ एप्रिल रोजी कणकवली येथे ‘ मराठी आठव दिवस साजरा झाला होता . याच मालिकेतील तिसरा ‘ मराठी आठव दिवस ‘ येत्या २७ मे रोजी गोव्यात पणजीत साजरा होणार आहे . 

स्वामीराज प्रकाशन आणि गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात गोमंतकीय कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ निःशब्दाच्या पैल हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे .

या परिसंवादात ज्येष्ठ कवी डॉ . महेश केळुसकर , कवयित्री व शंकर रामाणी यांच्या समग्र कवितेच्या संपादक डॉ . अनुजा जोशी व  शंकर रामाणी यांच्या ‘ एकट्याचे गाणे ‘ या पत्रसंग्रहाचे संपादक परेश प्रभू यांचा सहभाग असेल . त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ . केळुसकर असतील . या कविसंमेलनात कवयित्री राधा भावे , डॉ . अनुजा जोशी , पौर्णिमा केरकर , कवी परेश नाईक व ज्ञानेश मोघे यांचा सहभाग असेल . हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे . मराठीप्रेमींनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका सौ . रजनी राणे तसेच गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी केले आहे .

You cannot copy content of this page