सावंतवाडी ता.२०-:* डेगवे मोयझरवाडी येथून घरासमोरील माडाच्या झावळाच्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली ड्युक दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.यावेळी त्याचा जामीन अर्ज दाखल केला असता, अँड परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून 15 हजार रुपयांच्या जामिनावर सशर्त मुक्तता करण्यात आली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण आणि अँड प्रिया गावकर यांनी काम पाहिले.
दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपीस सशर्त जामीन मंजूर…
