मनसेची अधिकाऱ्यांकडे मागणी;ती सर्विस लाईन तात्काळ दुरुस्त करा…
सावंतवाडी ता.१८-:* न्हावेली चौकेकरवाडी येथे सर्विस लाईन तौक्ते वादळात तुटून पडली आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी आज वीज अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान मळगाव, निरवडे, न्हावेली, सोनूर्ली, तळवडे आदी भागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंतांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. न्हावेलीतील ग्रामस्थांनी आज सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, विलास चौकेकर, नंदू परब, वैभव चौकेकर, मुकुंद धारगळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या तौक्ते वादळात न्हावेली चौकेकर वाडी येथे सर्विस लाईन तुटून पडली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी दहा-बारा वेळा संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. मात्र वीज अधिकारी आणि कर्मचारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोणतीही जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर कनिष्ठ अभियंता यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अन्यथा आम्ही वरिष्ठ स्तरावर त्यांची बदलीची मागणी करू, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे
