पावसाळ्यापूर्वी खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करणार

भाजपातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ला तालुक्यातील मठ-बोवलेकरवाडी, आडेली-खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच हे खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

गेल्यावर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी व तिनचाकी वाहनधारकांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा भाजपाच्यावतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला.

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगराध्यक्षा डॉ. पुजा कर्पे, माजी नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समिर नाईक, तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page