स्वार्थी पद्धतीने आमदार वैभव नाईक यांनी जेडी जोड रस्त्याचे काम करून घेतले मंजूर…

ग्रामस्थांनी वेधले भाजप नेते निलेश राणे यांचे लक्ष…

मालवण दि प्रतिनिधी सर्जेकोट येथे ग्रामस्थांनी सुचवलेली कामे बाजूला ठेवून केवळ स्वार्थी पद्धतीने आमदार वैभव नाईक यांनी जेटी जोडरस्ताचे काम मंजूर करून घेतले आहे याठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी होड्या लावणे उतरणे मार्गातही अडथळा निर्माण होत आहे. याबाबत काही ग्रामस्थांनी भाजप नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले.

सोमवारी निलेश राणे यांनी सर्जेकोट येथे जेटी जोड रस्ता कामाची पाहणी केली. वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. आम्ही ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सर्जेकोट ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page