राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात केली चर्चा…

मालवण दि प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवणच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची भेट घेतली. भेटीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावाबाबत, महाराष्ट्र दर्शन परवानगी मिळण्याबाबत, इन्कम टॅक्स व अन्य प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

त्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर, तालुका सचिव जीवन हजारे, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद कदम, मनोहर मालंडकर, रतन बुटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page