राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत; आरोग्य व पर्यटन विषयावर चर्चा
सावंतवाडी ता 17:. खाजगी दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत आलेल्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आरोग्य व पर्यटन दुसऱ्या जिल्ह्यात भेडसावणाऱ्या अडचणी बाबत श्री. झिरवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. आपण लवकरच उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व ग्राम विकास मंत्री यांच्याशी एकत्र बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन झिरवाळे यांनी यावेळी दिले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, डी.के. टुरिझमचे डी. के. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान उपस्थित होते.
