सावंतवाडी ता.१७-:* सिंधुदुर्ग एडवेंचर अँड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने आंबोली मध्ये तीन दिवस सहासि क्रीडा व निसर्ग अभ्यास शिबिर संपन्न झाला या शिबिरास 25 ते 30 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता मुंबई-पुणे येथीलही लोक शिबिरात सहभागी झाली होती.
हिरण्यकेशी येथे दीपप्रज्वलन करुन या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोणावळा येथील नामवंत गिर्यारोहक तसेच रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेहमी अग्रेसर असलेले आनंद गावडे फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले वैभव राऊळ मायकल डिसोझा काका भिसे आदींनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
यानंतर हिरण्यकेशी येते रॅपलिंग क्लाईमिंग यासारखे साहसी क्रीडा प्रकार करण्यात आले रात्री वेळेस जंगल सफारी ही शिबिरार्थी साठी घेण्यात आली दुसऱ्या दिवशी नांगर्तास धबधबा येथे व्हॅली क्रॉसिंग स्विमिंग रिवर क्रॉसिंग वॉटर फॉल रॅपलिंग यासारखे क्रीडाप्रकार घेण्यात आले तर शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी महादेव गड येथे शिबिरार्थींना साहसी क्रीडा प्रकारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात आली व ते कसे वापरायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानंतर आंबोली महादेवगड ते सिद्धेश्वर या कडेकपारीतील रस्त्यावरती ट्रेकिंग घेण्यात आले सायंकाळी च्या सुमारास आंबोली वन उद्यान येथे या सहासी शिबिराचा समारोप करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुभाष पुराणिक यांनी जंगल जंगल याबाबतचे कायदे तसेच जंगल संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले व संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या यानंतर प्रशिक्षणार्थी व शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षक सुभाष पुरानिक अविनाश पराडकर प्रकाश करंदीकर हेमंत ओगले काका भिसे मायकल डिसोझा अजित नार्वेकर उत्तम नार्वेकर राकेश अमृतकर प्रथमेश गावडे कमलेश चव्हाण लॉरेन्स अल्मेडा आणि संतान आल्मेडा आदी उपस्थित होते
