मालवण ता.१६-:* मालवण बाजारपेठेतील भैरवी मंदिराचा १३ वा वर्धापन दिन दि. २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. मूर्तीवर अभिषेक, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६ वा. अष्टपैलू कला निकेतन प्रस्तुत संगीत गायन कार्यक्रम, रात्री ८ वा. श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे यांचे संगीत भजन, रात्री १० वा. श्री देव महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडी यांचा काळूबाईच्या नावानं चांगभलं हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरी सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी भैरवी बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे.
