मालवण ता.१६-:* मालवण मेढा येथील बालगोपाळ मित्रमंडळातर्फे आयोजित त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजे निमित्त दि. २० मे रोजी मेढा येथील मौनीनाथ मंदिरात खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० तर उत्तेजनार्थ प्रथम रु. १००० व द्वितीय रु. १००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी ९१७५८८६३८२ व ९१४५५५३९६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
