मालवण ता.१६-:* महाराष्ट्र शिक्षक पँनल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ मालवण दांडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. शिवराज सावंत यांना शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्हं व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र शिक्षक पँनल हा सुमारे पंचवीस हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय समुह आहे.या समुहामार्फत विद्यार्थी उपक्रमांसह दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराचे आयोजन केले जाते.
या करीता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उपक्रमशील कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांची निवड सदर समुहामार्फत करण्यात येते. सिंधुदुर्ग मधून यावर्षी मालवण दांडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत यांची निवड केली,गेली ३० वर्षे आपल्या सेवाकालात श्री.शिवराज सावंत यांनी अनेक उपक्रम,नवोपक्रम आपल्या शाळेत राबविले, बालचित्रवाणी पुणे मार्फत त्यांचे पाच शैक्षणिक पाठ सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित झाले आहेत,अनेक राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक प्राप्त झाली आहेत.विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांच्या शैक्षणिक साहित्याची पाचवेळा राज्यस्तरीय निवड झाली आहे.
राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व जिवनशिक्षण लेखन कार्यशाळा यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता,त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत तसेच त्यांनी मार्गदर्शन केलेले २१ विद्यार्थी शिष्यवृत्ती व नवोदय गुणवत्ता यादीत झळकले आहेत,२००९ मध्ये त्यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने ता सन्मानित आहेत.अशा या विद्यार्थीप्रिय शिक्षकास सेवासन्मान पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शिक्षक पँनलचा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री डाँ. निशिगंधा वाड यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिक्षक आमदार श्री.विक्रम काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षक आमदार श्री. बाळाराम पाटिल, पदवीधर आमदार श्री.सुधीर तांबे व महाराष्ट्र शिक्षक पँनलचे संस्थापक सदस्य श्री.दीपक चामे सर आदी उपस्थित होते,तसेच महाराष्ट्र शिक्षक पँनल तर्फे गुणी शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पँनलची सर्व टीम उपस्थित होती.
