जैन सभेच्या कोकण विभागावर महामंत्री म्हणून अजित शिराळकर यांची निवड…

देवगड (प्रतिनिधी) जैन समाजातील सर्वांत मोठी संघटना *दक्षिण भारत जैन सभा* आहे. त्या संघटनेच्या सांगली येथे झालेल्या आजच्या त्रैवार्षिक १०० व्या ( शताब्दी )महाअधिवेशनमध्ये कोंकणातील जैन समाजातील धार्मिक व सामाजिक काम / कार्य बघून रत्नागिरी येथील दिगंबर जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी अजित शिराळकर यांची दक्षिण भारत जैन सभेच्या – कोंकण विभागावर महामंत्री म्हणून निवड केली आहे.*हे श्री भगवंताच्या आशीर्वादाने व तुम्हां सर्वांच्या सहकार्याने* शक्य झाले आहे.

श्री भगवंतांचा आशीर्वाद व तुम्हां सर्वाचे सहकार्य* असेच राहुदे व माझ्याहातून असेच धार्मिक व सामाजिक कार्य अखंड राहु देतअशीं प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली . या निवडीसाठी दिगंबर जैन कासार समाज संस्था सांगली चे अध्यक्ष पोपटराव डोर्ले , कोल्हापूर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे ,माणगाव सुकुमारआण्णा पाटील , द भा जै सभा चे खजिनदार संजय शेटे व मुख्यमहामंत्री डॉ अजित पाटील यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले ,त्यांच्या या निवडीबद्दल दिगंबर जैन कासार समाज कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले तसेच अन्य पदाधिकारी समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page