सावंतवाडी 14: सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज भगवे झेंडे व वेशभूषा साकारत सनातन संस्थेच्या वतीने भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता
सनातन संस्थेच्या वतीने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवा निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदूराष्ट्र जागृती अभियान राबवले जात आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदूंमधील ब्राह्मतेज वाढवून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी येथील शहरात आज भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली या हिंदू एकता दिंडीचा येथील गवळी तिठा येथून प्रारंभ झाला त्यानंतर आत्मेश्वर मंदिर, उभा बाजार, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, नगरपरिषद, श्रीराम वाचन मंदिर, या मार्गाने जाऊन येथील बस स्थानकाजवळ दिंडीची सांगता करण्यात आली मोठ्या संख्येने हिंदूंनी बांधव या दिंडीत सहभागी झाले होते तर दिंडीतील बांधवांनी भगवा पोषक परिधान केल्याने तसेच भगव्या झेंड्यांनी शहर परिसर भगवेमय झाला होता छोट्या छोट्या मुलांनी अनेक वेशभूषा साकारल्या होत्या लाना होगा लाना होगा हिंदू राष्ट्र लाना होगा अश्या अनेक घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता
