वेर्ले शाळा नं १ चे शतक महोत्सव उत्साहात

माजी विद्यार्थी गोविंद लिंगवत यांनी केला शुभारंभ

सावंतवाडी ता 14: येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. १ शाळेचे २०२२-२३ हे वर्ष शाळेचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा गुरुवार दि 12 संपन्न झाला जेष्ठ माजी विद्यार्थी गोविंद जानू लिंगवत यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

ह्या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत वेर्ले सरपंच सुरेश वि. राऊळ, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुख्याध्यापक भाग्यश्री राणे, सौ राणे, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष राऊळ, वेर्ले पोलीस पाटील अरुण लिंगवत, लाडजी राऊळ, बाबा राऊळ, गणेश घाडी आदी उपस्थित होते

वेर्ले येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं 1 ह्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली असून ‘गावाला शाळेचा अभिमान असावा, शाळेला गावाचा आधार असावा’ हे ध्येय ठेवून २०२२-२३ हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा गुरुवार दि 12 मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला जेष्ठ माजी विद्यार्थी गोविंद जानू लिंगवत यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम पार झाला

You cannot copy content of this page