मोती तलावातील गाळ काढण्याची मोहीम आठ दिवसांनी समाप्त

३२१ डंपर काढण्यात आला गाळ;सहकार्य करणाऱ्यांचा न पप्रशासनाने मानले आभार

सावंतवाडी ता 14: येथील मोती तलावात सुरू असलेली गाळ काढण्याची मोहीम आज अखेर आठ दिवसानंतर थांबवण्यात आली यात तब्बल 321 डंपर गाळ उपसा करण्यात आला या गाळ उपसा मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नगर पालिका प्रशासनाकडून आभार मानण्यात आले

येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे तलावाच्या सौंदर्याला धोका निर्माण झाला होता तर येथील उद्यानासमोर मोठ्या प्रमाणात गाळ साचून त्यावर पानझडी निर्माण झाली होती याबाबत अनेक वेळा नागरिकांनी लक्ष वेधून गाळ काढण्याची मागणी केली पालिकेतील झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीनंतर सहमताने लोकसहभागातून गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर या मोहिमेला 6 मे पासून सुरुवात करण्यात आली होती गेले आठ दिवस ही मोहीम युद्धपातळीवर सुरू होती यात तब्बल 321 डंपर गाळ बाहेर उपसा करण्यात आला ह्या 8 दिवसाच्या गाळ उपसा मोहिमेत आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून डोजर तर माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावले, बांधकाम व्यवसायिक निरज देसाई, माजी नगरसेवक उदय नाईक आदींसह पालिका असे मिळून सर्वांनी आवश्यक डंपर तसेच अन्य सहकार्य दिले

You cannot copy content of this page