मालवण ता.१४-:* महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने मालवण येथील भंडारी हायस्कुलमध्ये आयोजित विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय टेबलटेनिसपटू आणि भारताच्या महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षक ममता प्रभू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, नितीन तळेकर, दिपक जाधव, चंद्रकांत रेवंडकर, अनिल आचरेकर, अरूण भोगले उत्तम पाटील, राजू अंधारी, किशोर शिगले, मुकुंद काजरेकर, उल्हास पराडकर अनिल मुंडये, चंदू गिरकर, मोहन केरकर आदी व इतर उपस्थित होते. भंडारी हायस्कूलच्या दहावीची १९७१-७२ च्या बॅच टेबल टेनिसचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन व १९७१- ७२ च्या बॅचने या दोन दिवसीय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मुले व मुली एकेरी- ११, १३, १५ व १७ वर्षाखालील गट, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी व पुरुष ६० वर्षावरील असे गट आहेत. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
