तालुका शिवसेनेची महत्त्वाची बैठक १४ मे रोजी

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची १२ मे २०२२ रोजी होणारी मासिक बैठक दि. १४ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व फ्रंटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.

या बैठकीत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि. २६ ते २९ मे कालावधीत राबविण्यात येणा-या शिवसंफ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौ-यात या अभियानाची यशस्विता साधण्यासाठी त्याचे नियोजन करणे तसेच आगामी काळात होणा-या जि.प., पं.स. व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ निहाय आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page