डॉ जयेंद्र परुळेकर यांच्याहस्ते धनादेश वाटप
सावंतवाडी ता 11: डॉ परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून 5 गरजू रुग्ण व एका गरजू विद्यार्थिनीला आर्थिक सहकार्य करण्यात आले डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते गरजूंना हा धनादेश प्रदान आला यावेळी त्या गरजूंनी डॉ परुळेकर यांचे मनापासून आभार मानले.
कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गरजू रुग्ण व आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाते प्रतिवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करिना महादेव शेटये मडूरा, रुची वासुदेव वालावलकर वालावल, माधवी महादेव परब कोलगाव, यशवंत गणेश जाधव कवठणी, व्यंकू राजाराम पांगुळ पिंगुळी, बाळकृष्ण केशव मार्गी केरवडे ह्या 6 गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली यात एक गरजू विद्यार्थिनी तर 5 आजाराने त्रस्त रुग्णांचा समावेश आहे यापुढेही गरजूंना आर्थिक मदतीचे कार्य सुरु राहणार असून गरजूंनी योग्य ती कागदपत्रे येथील डॉ परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे सादर करण्याचे आवाहन डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे
