१८ मे व १५ जूनला सावंतवाडीत आरटीओ कॅम्प : सुधीर आडिवरेकर
सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या कालावधीत गेली दोन वर्षे बंद असलेले आरटीओ कॅम्प पुर्ववत सुरू करण्यात आले आहेत. सावंतवाडीत विश्रामगृहाचं काम सुरु असल्यानं जागा उपलब्ध होत नव्हती. यावेळी माजी आरोग्य सभपती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत या आरटीओ कॅम्पसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी जिमखाना मैदान येथील बॅटमिंटन हॉल इथं हि व्यवस्था उपलब्ध करून दिली असून १८ मे व १५ जून या कालावधीत आरटीओ कॅम्प सावंतवाडीत होणार आहे अशी माहिती सुधीर आडिवरेकर यांनी दिली.
