मळगाव घाटीत सायकलस्वाराचा अपघात

सावंतवाडी ता.११-:* मळगाव घाटीतील रस्त्याच्या सदोष साईट पट्टीमुळे आज सकाळी एका सायकल स्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जख्मी झाला आहे. दिलीप म्हापसेकर असे त्यांचे नाव असून, ते सावंतवाडी मध्ये एल आय सी ऑफिसर आहेत. या अपघाताची माहिती डी के सावंत यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप म्हापसेकर नेहमी प्रमाणे सकाळी मळगाव घाटीत सायकल वरून फिरत असताना. मळगाव घाटात अचानक समोरून येणाऱ्या वाहनापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपली सायकल बाजूला घेतली असता, ती खड्ड्यात जाऊन त्या सायकलचे दोन तुकडे होऊन अपघात झाला. यावेळी डोक्यावर हेल्मेट असून देखील ते रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. यावेळी संदीप कुडतरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करत रुग्णालयात दाखल केले.

You cannot copy content of this page